Daily Mahasatta

Daily Mahasatta

आ. आसगावकरांनी शिक्षण क्षेत्राची कैफियत मांडावी : रावसाहेब पाटील

सांगली (प्रतिनिधी)

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आ. आसगावकर यांनी शासनासमोर कैफियत मांडावी, असे आवाहन महामंडळाचे खजिनदार रावसाहेब पाटील यांनी केले. कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.

शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, कनिष्ठ महाविद्यालयीन संच मान्यता झाली नाही म्हणून पगार बंद करण्याचा शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी काढलेला आदेश मागे घ्यावा. महापूर व कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन २०१९ - २० ते २०२१-२२ या तीन वर्षाच्या संच मान्यता रद्द कराव्यात. शिक्षण उपसंचालक व कोल्हापूर शिक्षणाधिकारी यांच्या कडे प्रलंबित शिक्षक मान्यता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन ठेवून अल्पसंख्याक शाळांमधील अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांच्या मान्यता त्वरित द्याव्यात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऑनलाईन शिक्षण, निकालाच्या कामात शिक्षक व्यस्त आहेत. फी वसूलीस निर्बंध लादल्याने त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ५० %फी वसूलीस परवानगी मिळावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या.

यावेळी आ. आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस रावसाहेब पाटील, शिवाजी माळकर, एस. डी. लाड, प्रा. एन. डी. बिरनाळे, पुंडलिक जाधव, बाबा पाटील, इनामदार, संजय यादव, भागवत, खतीब, उदय पाटील, संदीप पाटील, एम. एन. पाटील, वडेर व संस्था चालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments