Daily Mahasatta

Daily Mahasatta

सोनहिराचा मिल रोलर पुजन कार्यक्रम संपन्न

कडेगांव (सचिन मोहिते) : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कदमनगर, वांगी या कारखान्याचा सन 2021-22 गळीत हंगामातील 22 वा मिल रोलर पुजन व प्रतिष्ठापणा कार्यक्रम सोमवार दि.14/06/2021 रोजी सकाळी 9.00 वाजता कारखान्याचे संचालक व शेती कमिटीचे चेअरमन मा.श्री. रघुनाथराव कदम यांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण विधीयुक्त पुजन व रिमोटची कळ दाबून करणेत आला. या कार्यक्रमाचे नियोजन, स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे चिफ इंजिनिअर श्री. सयाजी पाटील यांनी केले.

यानंतर कारखाना कारखान्याचे संचालक व शेती कमिटीचे चेअरमन मा.श्री. रघुनाथराव कदम म्हणाले की, सन 2021-22 या गाळप हंगामातील मिल रोलर पुजन, प्रतिष्ठापणा कार्यक्रम आज आपणां सर्वांचे उपस्थितीमध्ये कोरोना सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी ठेवून करणेत आला. सन 2021-22 हंगामातील गाळपाच्यादृष्टीने सर्व यंत्रसामुग्रीचे ओव्हरऑईलींग, फिटींग इ. तद्नुषंगीक सर्व कामे सुरु आहेत. ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर बैलगाडी, ऊस तोडणी मशिन इ. चे तोडणी-वाहतूक करार सुरु आहेत.  कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याकडे नोंद केलेला आपला सर्व ऊस गाळपाच्यादृष्टीने आपल्या कारखान्याकडे पाठवून योग्य सहकार्य करावे. आपणा सर्वांचे सहकार्य व चांगले योगदान लाभलेमुळे आपले संस्थेचे नांव महाराष्ट्र राज्यात व देशात झाले आहे. त्यामुळे आपल्या कारखान्यास राज्यस्तरीय व देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत याचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन-मा. पोपटराव महिंद, संचालक – मा.निवृत्ती जगदाळे, मा.बापूसो पाटील, प्रभाकर जाधव, युवराज कदम, दिलीपराव सुर्यवंशी, जगन्नाथ माळी, पंढरीनाथ घाडगे, शिवाजीराव काळेबाग तसेच ऊस उत्पादक सभासद शेतकरी आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक – मा. शरद कदम, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, मिल विभाग कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments