Daily Mahasatta

Daily Mahasatta

विलगीकरण कक्षाची कडक अंमलबजावणी करा : जितेंद्र डुड्डी

इस्लामपूर (हैबत पाटील) : आज  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी वाळवा तालुक्यातील सर्वात जास्त कोरुना रुग्ण असलेल्या दहा गावांना भेट दिल्या.यामध्ये प्रामुख्याने कासेगाव तांबवे, नेर्ले,पेठ, रेठरे धरण ,कामेरी , बोरगाव, जुनेखेड, वाळवा, बागणी इत्यादी गावांचा समावेश होता. भेटीदरम्यान त्या गावातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या सर्वांची उपस्थिती मध्ये सर्व जास्त पॉझिटिव्हिटी असणाऱ्या गावांचा आढावा घेण्यात आला, या सर्व गावांमध्ये  सूचनांची अंमलबजावणी करणे बाबत आदेश दिले. अजूनही बरेच नागरिक विना मास्क व विनाकारण फिरताना दिसतात अशांवर निर्बंध लावण्यासाठी दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जास्त संपर्कातील म्हणजेच हाय रिस्क लोकांची यादी सविस्तर घ्यावी ती प्रत्येक केस पाठीमागे पंधरा पेक्षा खाली असू नये.

एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या 100 मीटर परिक्षेत्रातील सर्व व्यक्तींची तपासणी करून घेण्याबाबत सूचना दिल्या. यामुळे न समोर येणारे केसेस सापडण्यासाठी मदत होईल व त्यांच्या पासून होणारा प्रादुर्भाव थांबेल असेही त्यांनी सांगितले.

खासगी डॉक्‍टरांच्या कडून प्राप्त होणाऱ्या ILI / SARI नावांची दररोजचा दररोज कोरोना चाचणी करून त्या संदर्भातील पुढील कारवाई करावी. पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील  म्हणजेच हाय रिस्क व लो रिस्क लोकांचे गृह अलगीकरण व्यवस्थित करणे बाबत सूचना दिल्या. जे लोक ऐकत नाहीत अशांवर कायदेशीर कार्यवाही करणे बाबत सूचना दिल्या.

ज्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरांमध्ये गृह विलगीकरण ची सोय नाही अशा सर्व लोकांना संस्थात्मक विलगीकरण  मध्ये दाखल  सर्व दक्षता कमिटीची मदत घेऊन करणेबाबत सूचित केले. जे रुग्ण गृह अलगीकरण मध्ये आहेत त्या सर्व लोकांना मूलभूत गरजा व गोष्टींची मदत ग्रामपंचायत व इतर सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन करण्याबाबत आवाहन केले. ज्या गावांमध्ये जास्त कोरोना रुग्ण आहेत अशा गावांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंध घालून विनाकारण फिरणाऱ्या व विनाकारण गावामध्ये येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवावे.

कृष्णा कारखाना निवडणूक संदर्भात बोलताना सर्व उमेदवार व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी टेस्टिंग करून घेण्याबाबत सूचना दिल्या तसेच जर एखादा परगावचा उमेदवार तुमच्या गावांमध्ये प्रचारासाठी येत असेल तर त्यांनी हि प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून मगच प्रचार करावा तसेच उमेदवारांनी ही सामाजिक भान ठेवून जास्तीत जास्त सोशल मीडिया मार्फत प्रचार करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

वाळवा तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे , पोलिस निरीक्षक देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ साकेत पाटील सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी ग्रामविकास अधिकारी तलाठी व इतर शासकीय कर्मचारी यांना वरील प्रमाणे  कार्यवाही बाबत सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments