Daily Mahasatta

Daily Mahasatta

युवकांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत : संग्रामसिंह देशमुख

वाळवा (रहिम पठाण) : युवकांनी एकत्र येऊन असे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत आणि गावच्या विकासासाठी निस्वार्थी काम करावे, असे मत संग्रामसिंह देशमुख  यांनी व्यक्त केले.

मसुचीवाडी ता.वाळवा येथे युवकांनी एकत्रीत येऊन कोरोना कालखंडात रक्तदानाची गरज ओळखून रक्तदान शिबीर व कोव्हीड योध्दा सन्मान असा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी संग्रामसिंह देशमुख बोलत होते.

यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांच्या सहकार्याने व अक्षय कदम मित्र परीवार यांच्या वतीने हे रक्तदान शिबीर संपन्न  होत  आहे एकूण 72 लोकांनी रक्तदानासाठी नोंद केली आहे.

यावेळी गावातील प्राथमिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, गावातील डाॕक्टर यांचा कोरोना योध्दा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी युवा नेते प्रविण माने, माणिकराव कदम,संभाजी कदम, उपसरपंच शांताराम कदम, प्रकाश माने व अक्षय कदम मित्र परिवारातील सर्व युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत  हौसेराव पाटील यांनी  केले तर आभार सुहास कदम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments