Daily Mahasatta

Daily Mahasatta

लोकनेते कै. फत्तेसिंगराव नाईक ट्रस्टकडून औषधे, सँनिटायझर वाटप

शेडगेवाडी  (याकुब मुजावर) : लोकनेते कै. फत्तेसिंगराव नाईक चॅरिटेबल ट्रस्ट कोकरूड यांच्यावतीने कोकरूड ग्रामीण रुग्णालय कोविड सेन्टरला औषधे, सँनिटायझर , पाणी बॉटल भेट देण्यात आले.

लोकनेते कै. फत्तेसिंगराव नाईक चॅरिटेबल ट्रस्ट कोकरूड यांच्यावतीने  प्रत्येकवेळी समाजउपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसारण्याच्या मार्गावर आहे. समाजातील विविध समाजसेवी संस्था कोव्हिड सेन्टरला आपापल्या परीने मदत करत आहेत. 

कोकरूड येथील लोकनेते कै. फत्तेसिंगराव नाईक चॅरिटेबल ट्रस्ट  यांच्यावतीने कोकरूड कोविड सेंटर मध्ये कोरोना रुग्णांना औषधे,सँनिटायझर , पाणी बॉटल भेट देण्यात आले.यावेळी ट्रस्टच्या अध्यक्ष संगीता पाटील, कार्यकारी अध्यक्ष विश्वजित पाटील, संचालक वैभव वाघमारे , अशोक पाटील- भेडसे, राजू घोडे- पाटील व आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments