Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाला ब्रेक, मात्र मृत्यूचे थैमान सुरूच

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात बुधवार ता. २ रोजी गेल्या तीन महिन्यातील सर्वांत कमी म्हणजे ८९५ इतके रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत. मात्र जिल्ह्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यूचे थैमान अद्याप सुरुच आहे. आज एकाच दिवशी जिल्ह्यातील ३३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक काही प्रमाणात कमी झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. मात्र कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कायम आहे. दररोज ३० ते ४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे, ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. आजअखेर १ लाख २० हजार २६९ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून यापैकी ३ हजार ४८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

आज दिवसभरात तालुका निहाय आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : आटपाडी ३४, जत ४९, कडेगाव ५७, कवठेमंहकाळ ५८, खानापूर ४४, मिरज ९७, पलूस ६४, शिराळा ७३, तासगाव ४९, वाळवा २१९ तसेच सांगली शहर १२७ आणि मिरज शहर २४ असे सांगली जिल्ह्यातील एकूण ८९५ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत. तसेच दिवसभरात १३२० रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments