Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यातील केशकर्तनालय सुरू

सांगली (प्रतिनिधी) सांगली जिल्ह्यातील 
केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स / व्यायामशाळा सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत 50 % क्षमतेसह फक्त नियोजित वेळ घेवून (only with prior appointmen), वातानुकुलीत न वापरता, फक्त लसीकरण झालेल्या ग्राहकांना सेवा देणेचे अटीवर सुरु राहतील. तसेच शनिवार व रविवार या व्यवसायाला प्रतिबंध असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. 

सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, अशी सुचना प्रशासनाने दिली आहे. शासनाने केशकर्तनालय व्यवसायाला परवानगी दिल्यामुळे नाभिक समाजाला मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments