Daily Mahasatta

Daily Mahasatta

झिल इंटरनॅशनल स्कूल सांगली येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

सांगली (प्रतिनिधी) : झिल इंटरनॅशनल स्कूल सांगली येथे आंतरराष्ट्रीय योगा व संगीत दिवस ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या प्राचार्य  आल्फोन्सो लॉरेन्स उपस्थित होत्या.

 झिल इंटरनॅशनल स्कूल सांगलीमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिनाचे औचित्य साधून  सांगली येथील बामणोली गावातील झिल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज  मध्ये ऑनलाईन पध्दतीने योगा दिवस आणि संगीत दिवस वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला . कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्य आल्फोन्सा लॉरेन्स , समन्वयक विजय गिते आणि मेघाली मगदूम उपस्थित होते.संगीत दिवस साजरा करण्याच्या हेतूने आज शाळेमध्ये  ऑनलाईन संगीतमय प्रार्थनेचे  आयाेजन केले हाेते. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी किशोर कुमार यांचे गीत गाऊन त्यांना श्रद्धांजली  वाहिली . त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रत्येक संगीत साधनांची माहिती दिली  दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व ऑनलाईन  योगा  प्रात्यक्षिक दाखवून  समजविण्यात आले आले आंतरराष्ट्रीय योगा आणि संगीत दिवसाचे महत्त्व संस्थेचे कार्यकारी संचालक प्रदीप खांडवे  यांनी ऑनलाईन प्रसारमाध्यमांतून पटवून दिले. त्याचबरोबर  कमी कालावधीत संस्थेवर पालकांनी  दाखविलेल्या  विश्वासाचे  ही कौतुक केले . या कार्यक्रमास  शाळेचे प्रचार्या   आल्फोन्सो लॉरेन्स  समन्वयक विजय गिते आणि पर्यवेक्षक मेघाली मगदूम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते  .

Post a Comment

0 Comments