Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन

विटा (प्रतिनिधी)
फुलेनगर - ज्योतिबानगर येथील प्रभागातील विद्यमान नगरसेविका आणि पाणीपुरवठा सभापती सौ मालतीताई विश्वनाथ कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत डांबरी रस्ते, गटारी, अंतर्गत बोळ काँक्रीटीकरण अशी एकूण एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा भूमिपूजन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, विश्वनाथ कांबळे, माजी नगरसेवक प्रशांत आप्पा कांबळे, माजी उपनगराध्यक्ष अजित दादा गायकवाड, धर्मेश भैय्या पाटील, विनोद पाटील, गजानन निकम यांच्या हस्ते संपन्न  झाले.

यावेळी जे के कांबळे, विलास कांबळे, सुलिंदर कांबळे, विशाल भिंगारदेवे, मानशिंग कांबळे, सचिन कांबळे, विक्रम अवघडे, रामभाऊ यादव, रवींद्र मोहिते, रवींद्र सातपुते, राहुल कांबळे गुरुलिंग सोने, जावेद मुल्ला, अतिश कांबळे, नामदेव कांबळे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments