Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिराळा एमआयडीसीत वादळी वारे व ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीशिराळा (विनायक गायकवाड) : येथील एमआयडीसी मध्ये सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या ढग फुटीच्या पावसात अनेक कंपन्या त्यांच्या इमारती जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे.
तीन दिवसापासून शिराळा तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारी २ वाजल्यापासून दाट ढग दाटून आले होते. दुपारीच सायंकाळ झाल्यासारखे वातावरण तयार झाले होते. ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा व पावसाची तीव्रता इतकी जास्त होती की बघता बघता कंपन्यांच्या छतावरील पत्रे उडून जायला सुरवात झाली. पक्ष्यांच्या हव्या प्रमाणे ही पत्रे उडून इतरत्र शेतात व दुसऱ्या कंपन्यांवरती जाऊन आदळले आहेत. वाहनांचे, मोठ्या झाडांचे देखील नुकसान झाले आहे.

काही कंपन्या लॉकडाऊन मुळे बंद आहेत. तर काही कंपन्या शासकीय नियमानुसार ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्या वरती सुरू असल्याने मोठी जीवित हानी टळली आहे. उडून गेलेले पत्रे व पडलेले इमारतीचे काही भाग पाहिले असता या ढगफुटीची आणि वादळाची तीव्रता लक्षात येते. एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या दोन महिला व चार पुरुष असे सहा जण जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याबाबत अधिकृत माहिती समजलेली नाही. शहरातील सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर कंपन्यांचे मालक व्यवस्थापक यांनी एमआयडीसीमध्ये धाव घेत किती नुकसान झाले आहे याचा अंदाज बांधण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments