Daily Mahasatta

Daily Mahasatta

राज्यातील मेडिकल लॅब्ज नियंत्रण समितीवर विट्यातील गिरिश शरनाथे यांची निवड

विटा (प्रतिनिधी) : राज्यभरातील वैद्यकीय प्रयोगशाळांचे (मेडिकल लॅबोरेटरी) नियंत्रण व नियमन करण्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे तयार करणाऱ्या समितीवर विट्यातील गिरीश शरनाथे यांची निवड झाली आहे. ही समिती राज्यातील वैद्यकीय प्रयोगशाळेचे कामकाज आणि शुल्क आकारणी यात समानता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम करते, अशी माहिती खानापूर तालुका अध्यक्ष संभाजी पाटील (विजया लॅबोरेटरी विटा) यांनी दिली

राज्यभरात सध्या पंधरा हजार मेडीकल लॅबोरेटरीज कार्यरत आहेत. या क्षेत्रात अद्यापपर्यंत कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. त्यामुळे कायदेशीर अडचणी येत असतात. या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अॅनालिस्टस अॅण्ड प्रॅक्टिशनर्सने मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. त्यानुसार वैद्यकीय प्रयोगशाळा (मेडिकल लॅबोरेटरी) व्यवसायासंदर्भात नियंत्रण आणि नियमन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालय आणि संबंधित क्षेत्रातील व्यक्ती यांची समिती तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासमितीत आरोग्य सेवा आयुक्तालय आणि संबंधित क्षेत्रातील व्यक्ती यांची समिती गठीत केली आहे. 

या समितीत आरोग्य सेवा आयुक्तालया तील अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह पाच अधिकारी आणि संबंधित क्षेत्रातील राज्यातील पाच तज्ञ व्यक्तींचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश केला आहे. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून विट्यातील गिरीश शरणाथे यांची निवड झाली आहे. ही समिती वैद्यकीय प्रयोगशाळा (मेडिकललॅबोरेटरी) स्थापन करण्यासाठी व व्यवसायाचे नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल. अवैध अथवा बोगस वैद्यकीय प्रयोगशाळांवर निर्बंध आणण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवण्याचे काम करणार आहे, अशी माहिती संभाजी पाटील (विजया लॅबोरेटरी विटा) यांनी दिली.

Post a Comment

0 Comments