Daily Mahasatta

Daily Mahasatta

बोरगाव चे जेष्ठ नेते एल. के. पाटील यांचे निधन

वाळवा (प्रतिनिधी) : बोरगाव ता.वाळवा गावचे सुपुत्र व यशवंतराव मोहिते कृष्णा सह.साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव केशवराव पाटील (वय 81) यांचे शुक्रवारी निधन झाले.

वाळवा तालुका काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परीषद सदस्य जितेंद्र पाटील यांचे ते वडील एल के पाटील हे भागात तात्या या नावाने ओळखले जात होते सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले नेते म्हणून ते ओळखले जात होते वाळवा तालुक्यातून ते 20 वर्षे कृष्णा कारखान्यात संचालक म्हणून काम पाहत होते.

अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना दोन दिवसापूर्वी कराड येथे रुग्णालयात दाखल केले होते रात्री उशीर बोरगाव येथे कृष्णा काठावरती त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

0 Comments