Daily Mahasatta

Daily Mahasatta

'त्यांचे' नाव घेण्याचे औदार्य राष्ट्रवादीकडे नाही : निशिकांत पाटील

इस्लामपूर (हैबत पाटील) : स्वच्छ सर्वेक्षण बक्षिसाच्या रकमेतून २ कोटी ८० लाखांच्या कामांना राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती राष्ट्रवादीकडून प्रसिद्धीस दिली गेली आहे पण ती रक्कम देवेंद्र फडणवीस यांच्या मुळे मंजूर झाली आहे त्यांचे नाव घेण्याची कुवत राष्ट्रवादी कडे नसल्याची टीका नगराध्यक्ष निशिकांत पाटील व विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली .

राष्ट्रवादीच्या विश्वनाथ डांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत इस्लामपूर नगर परिषदेस जाहीर झालेल्या बक्षिसाच्या रकमेतून २ कोटी ८० लाखाच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती प्रसिद्धीस दिली होती त्याला उत्तर देताना ते बोलत होते , यावेळी बोलताना नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले , स्वच्छ सर्वेक्षण ही कल्पना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमलात आणली त्या मध्ये इस्लामपूर नगर पालिकेने पश्चिम विभाग व देशपातळीवरील दोन्ही ही क्रमांक मिळवले त्यात इस्लामपूर जनतेने मोठा हातभार व सहभाग दिला होता. त्यातून मिळालेल्या बक्षिसाची रक्कम शहरातील विकास कामांसाठी साठी वापरावी या साठी नगर विकास खात्याकडे विविध कामांचे प्रस्ताव देण्यात आले होते 

ते म्हणाले," इस्लामपूर नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये १५ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले होते. या रकमेतील काही निधी विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक कामे स्वच्छता व आरोग्य विभागाच्या संबंधित आहेत. 

या मध्ये मंत्री तलावा सुशोभीकरणासाठी ६३ लाख ३८ हजार ९८९. साठेनगर सार्वजनिक सौचालय २७,०९,१९१, आबेडकर नगर हद्दीत सौचालय बांधणे,२७,०९,१९०, ट्रॅक्टर एसटीपी पंप - ६ लाख ७००.
२ सीटचे व सिंगल सीट मुतार्या - ४२ लाख २० हजार.४ सीटचे फिरते शौचालये- ४४ लाख. ट्रॅक्टर ट्रॉली - २६ लाख १२ हजार १३६ धूर फवारणी मशीन - ४ लाख ६० हजार ७९२
टॉयलेटच्या स्वतंत्र चार ब्लॉकसाठी - ९३लाख बत्तीस हजार ११७ असा निधी असणाऱ्या कामांना दोन कोटी ७९ हजार ४४ हजार ७९४ रुपये खर्चासह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एका व्यक्तीसाठीची व दोन व्यक्तींसाठीची मुतारी प्रत्येकी दहा ठिकाणी असतील. ४ सिट्ची फिरती शौचालये दहा नग असणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रवादीची सवय दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याची आहे.

यावेळी बोलताना विक्रम पाटील म्हणाले, या वर आम्ही राजकारण करणार नाही मात्र आमच्या कारकिर्दीत पालिकेने नंबर मिळवला व त्यातून मिळालेल्या रकमेतून शहराचा विकास साधणार आहोत. राष्ट्रवादीला गेल्या 30 वर्षात जे जमले नाही ते साडेचार वर्षात आम्ही करून दाखवले व येत्या निवडणुकी पूर्वी 90 टक्के विकास कामे आम्ही पूर्ण करू असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला . सत्तेच्या माध्यमातून शहरातील जनतेला कधी त्रास दिला नाही . राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ता काळात जनतेला प्रचंड त्रास दिला आहे . आमच्या वाटचालीत शहरातील जनता आनंदी आहे असे ते म्हणाले. या वेळी वैभव पवार , भास्कर कदम , आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments