Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मधील डाबंरीकरण कामास  सुरवात : नगरसेवक गजानन मगदुम यांचे प्रयत्न

कुपवाड (प्रतिनिधी) : कुपवाड वार्ड क्रमांक २ मधील सिद्धार्थ नगरमधील सम्राट अशोक चौक ते नामदेव थोरात घरापर्यंतच्या मुख्य रस्ता हॉटमिक्स डाबंरीकरण कामास आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयत्तीचे औचीत्य साधुन  जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सुरवात करण्यात आली.

सदर कामाचा पाठपुरावा या भागातील नगरसेवक गजानन मगदुम यांनी केले कुपवाड शहरातील प्रमुख रस्त्यापैकी मुख्य रस्ता बर्‍याच वर्षापासुन सदरचा रस्ता वाहत्या सांडपाण्यामुळे खराब होत होता यासाठी नगरसेवक गजानन मगदुम यांनी सुरवातीस गटर मंजुर करण्यात आली होती त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता आता रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने सिद्धार्थनगर परिसरातील प्रमुख कामे मार्गी लावण्यात नगरसेवक गजानन मगदुम यांनी पाठपुरावा करुन पुर्ण करुन घेतली आहे.

रस्ता डांबरी कामाचा आज शुभारंभ करण्यात आला  यावेळी भागांतील ज्येष्ठ माजी उपसरपंच आनंदा कांबळे , मिलिंद सरोदे सर, दिलीपतात्या धोतरे , कुपवाड शहर संघर्ष समितीचे माजी अध्यक्ष अरुण तात्या रूपनर,  कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विजयदादा खोत , सामाजिक कार्यकर्ते आशुतोष धोतरे , रमेश जाधव, गोरख व्हनकडे ,संजय धोतरे  ,नाना धोतरे ,लाडू धोत्रे   ,हनमंत सरगर, अनिल मगदूम , राहुल धोतरे व  रोहन कोरे उपस्थित होते  यावेळी नागरिकांच्यावतीने दिलीप धोतरे यांनी नगरसेवक गजानन मगदूम यांनी सिद्धार्थनगरची मुख्य प्रश्न रस्ते व गटारी  पूर्ण करून सिद्धार्थनगर परिसरातील विकासकामे मार्गी लावल्याबद्दल  नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांनी आभार व्यक्त केले  तसेच सिद्धार्थनगर परिसरातील बौद्ध समाजमंदिर याचादेखील पाठपुरावा करून आपण प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती त्यांनी केली  यावेळी मिलींद सरोदे  यांनी सिद्धार्थनगर हा भाग ग्रामपंचायत कालावधीपासून दुर्लक्षित होता  या भागातील बहुतांशी अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्यावरील गटर व रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला होता  यासाठी गजानन मगदूम यांनी सतत पाठपुरावा ठेवून या दोन्हीही प्रश्नांचा  निपटारा करून घेतला  याबद्दल आभार मानले.

Post a Comment

0 Comments