Daily Mahasatta

Daily Mahasatta

राजीनाम्यानंतर पद्मसिंह पाटील यांनी राजकीय भूमिका केली स्पष्ट

विटा (प्रतिनिधी) : इथून पुढे माझे किती ही राजकीय नुकसान झाले तरी चालेल, पण जनतेसाठी उभा रहाणार. मला श्रेय मिळेल म्हणून जनतेची कामे होणार नसतील तर आता मी मुक्त होतोय व माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देतोय. व साहेबांच्या आशीर्वादाने नवीन सुरूवात करतोय, असे स्पष्ट करत आगामी काळात सत्ताधारी गटाच्या विरोधात भूमिका घेणार असल्याचे युवानेते पद्मसिंह पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पद्मसिंह पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित केलेल्या पत्रात म्हंटले आहे, राजकारण, समाजकारणात  जनतेबद्दल असलेल्या प्रेमापोटी  मी निवडणुकीत लोकनेते कै हणमंतराव पाटील (साहेब)  यांचा विचार व वारसा घेऊन उभा राहीलो. त्याच प्रेमाने जनतेने  ही मला स्वीकारले. पण नगरपालिकेत जनतेचे काम घेऊन गेलो की युवा नेत्यांनी मी सत्तेत असून सुद्धा  जनतेची कामे केली  नाहीत. वेळोवेळी मी अर्ज देऊन सुद्धा ती  कामे केलीच नाहीत . 

मी माझ्या दलित मित्राला पेट्रोल पंपा शेजारी वडापाव गाडा टाकून दिला. तोही तुम्ही मला का विचारून टाकला नाही? म्हणून युवा नेत्यांनी रात्री जेसीबी लावून उचला. आज पर्यंत तुम्ही गोर गरीबांवर जेसीबी चालवला व काही लोकांच्या जागेत चरी पाडल्या. जनता आता, बांधकाम परवाना , बिगरशेती, इत्यादी कामे करण्यासाठी पैसे देऊन आता दमली आहे. लोकनेते कै हणमंतराव पाटील (साहेब) सुद्धा विटा नागरपरिषदे मध्ये २८ वर्ष नगरसेवक होते. पण त्यांनी कधीच जनतेवर अन्याय केला नाही व कोणास अन्याय करू दिला नाही. त्यामुळे इथून पुढे माझे किती ही राजकीय नुकसान झाले तरी चालेल, पण मी जनतेच्या पाठीशी उभा रहाणार, असा स्पष्ट इशारा पद्मसिंह पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments