Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात २५ जणांचा बळी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज ८०२ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून दिवसभरात एकूण २५ रुग्णांचा उपचारादरम्यान बळी गेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. आज दिवसभरात ८०२ रुग्णांची नव्याने भर पडली आहे  सध्या जिल्ह्यात ९१०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात सुमारे ९८९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढील प्रमाणे आटपाडी ३२, जत २९, कडेगाव ७८, कवठेमंहकाळ ५३, खानापूर २८, मिरज १३२, शिराळा ५५, तासगाव ५६, वाळवा १५१, सांगली शहर ९८ आणि मिरज शहर ३६ असे जिल्ह्यात एकूण ८०२ रुग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments