Daily Mahasatta

Daily Mahasatta

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी विट्यात बालरोग तज्ञांची कार्यशाळा संपन्न

विटा (प्रतिनिधी) : आगामी काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना धोका असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे ही तिसरी लाट रोखण्यासाठी संबंधित यंत्रणेतील लोकांनी सज्ज राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले.

विटा शहरातील सर्व बालरोग तज्ञ डाॅक्टरांची कोव्हीड 19 बाबत उपायोजना व नियोजन करणे कामी कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील बोलत होते. 

या कार्यशाळेला शहरातील बालरोग तज्ञ डॉ. जे. एम. पवार, डॉ. दीपक शहा, डॉ. अजित शहा, डॉ. कुमार हजारे, डॉ. अमोल तारळेकर, डॉ. सुभाष वलेकर, डॉ. महेशकुमार हिंगमिरे, त्याचबरोबर नगरसेवक किरण तारळेकर, दहाविर शितोळे (आरोग्य सभापती) फिरोज तांबोळी (नगरसेवक) प्रशांत कांबळे, अविनाश चोथे, आरोग्य निरिक्षक आनंदा सावंत उपस्थित होते.

संभाव्य कोरोनाच्या लाटेतून बालकांना वाचविण्यासाठी योग्य ती खबरदारी नगरपरिषदेच्या् वतीने आतापासूनच घेतली जाईल असे मुख्याीधिकारी अतुल पाटील यांनी सांगितले. सदर कार्यशाळेमध्ये बालरोग तज्ञ डॉ. जे एम पवार यांनी मास्क व सॅनिटायझर वापरत असताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सुशांत वलेकर यांनी लहान मुलातील कोरोनाची लक्षणे व सौम्य लक्षणे याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. महेश हिंगमिरे यांनी कोरोना काळातील बालरूग्णा आहार याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. कुमार हजारे यांनी बालरूग्णा मधील लक्षणे ओळखून त्याच्या कोव्हीड चाचण्या करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच डॉ. दिपक शहा यांनी बालरूग्णांमध्ये संसर्ग का वाढतो व तो कसा रोखायचा याबाबत मार्गदर्शन केले व पावसाळ्यामध्ये पसरणा-या इतर साथरोग प्रतिबंध करण्यांसाठी नगरपरिषदेने योग्य ती उपाययोजना करावी असे सुचित केले. 

डॉ. अमोल तारळेकर यांनी बाल कोव्हीड रूग्णाची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अजित शहा यांनी कोरोना काळातील स्तनपान करताना मातांनी घ्यायवयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर सर्व बालरोग तज्ञांचा नगरपरिषदेमार्फत सत्काार करण्यात आला. अधिकारी, पदाधिकारी कर्मचारी यांनी कोरोना काळातील बालकांच्या बाबत भेडसावणारे प्रश्न व करावे लागणारे उपाय याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर सर्व बालरोग तज्ञांनी उपायांवर सुलभपणे मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments