Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात वाहनाला आग लागून भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू

विटा (प्रतिनिधी) : भाजी विक्रीसाठी वापरत असलेल्या मारूती कारला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भाजी विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार ता.7 रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाहू नगर विटा येथे घडली. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव रघुनाथ रामचंद्र ताटे (वय- 50) रा. शाहूनगर, विटा असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रघुनाथ ताटे हा भाजी विक्रेता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आपल्या मारूती कार मधून भाजीपाला तसेच किराणा मालाची विक्री करत होता. आज रघुनाथ ताटे हे सकाळी नेहमी प्रमाणे भाजी विक्रीसाठी निघाले. घरासमोरील भाजी आणि किराणामाल भरलेली मारूती कारला त्यांनी स्टार्टर मारला. यावेळी काही सेंंकदातच मारूती कारने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की ताटे यांना वाहनातून बाहेर देखील पडता आले नाही. आरडाओरडा ऐकून ताटे यांचा मुलगा त्यांच्या मदतीसाठी धावून आला. मात्र भीषण आगीत ताटे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे विटा शहरातून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments