Daily Mahasatta

Daily Mahasatta

प्रकाश ब्लड बँकेच्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इस्लामपूर ( प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उरुण -इस्लामपुरचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपुर विधानसभा भाजपाच्या वतीने व प्रकाश ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.यामध्ये १२३ युवकांनी रक्तदान केले. शिबीराचे उदघाटन माजी आमदार भगवानराव सांळुखे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी निशिकांत भोसले - पाटील  म्हणाले, चंद्रकांत पाटील  हे सर्वसामान्याचे नेते आहेत,त्यांना समाजकारणाची पहील्यापासुन आवड असल्याने वाढदिवसानिमित्त ते नेहमीच समाजहिताचे उपक्रम राबवत असतात . त्यांच्या विचाराचा आदर्श घेऊन ऐन कोरोनाच्या लढाईत रूग्णांची गरज ओळखुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना च्या नियमांना अधिन राहुन हा उपक्रम राबविण्यात आला.
           
सर्व रक्तदात्या युवकांना वृक्ष व प्रमाणपत्र देऊन सन्मान वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
            
यावेळी प्रांजली निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत, भाजपाचे शहर अध्यक्ष अशोकराव खोत,अजित पाटील, भाजपा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष प्रविण माने,प्रविण परीट,शरद अवसरे, जाधव,निवास पाटील,सुभाष चव्हाण, विजय पाटील,रणजीत माने,सचिन जगदाळे, अनिकेत पाटील, नाथगोंडा पाटील, विजय शिंदे,रावसाहेब पाटील,शरद पाटील,अनिल सरदेशमुख,विश्वजीत पाटील,तात्यासो कोळेकर आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments