Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात शेळ्या चोरणाऱ्या पाचजणांची टोळी गजाआड

इस्लामपूर (सुर्यकांत शिंदे) : चैनीसाठी अलिशान गाडीचा वापर करून शेळ्या चोरणाऱ्या ५ जणांना इस्लामपूर पोलिसांनी गजाआड करत सुमारे सव्वादोन लाख रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.१) अजित पाडुरंग सुर्वे( वय २९ वर्षे )रा.नरसिंहपुर, २) अजय रघुनाथ झीमुर (वय २९ वर्षे) ,३) अभिषेक कैलास गोतपागर (वय २३ वर्षे), धनजय अनंदा काबंळे (वय २९ वर्षे), ५) किरण दिपक लोहार( वय २३ वर्षे) सर्व रा.इस्लामपुर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.इस्लामपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेळ्या चोऱ्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी आदेश दिले होते.  त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिगळे व पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदशनाखाली इस्लामपुर पोलीस ठाणे हददीत पथकाचे आरोपी शोध कार्य सुरु होते.  बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीच्या अनुषंघाणे दि. ११/०६/२०२१ रोजी इस्लामपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून या ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांनी नर्सिंगपुर येथील चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातील २० हजार रु. किमतीची ३ भोर जातीची बोकडे, १ शेळी व २ लाख किमतीची एक अलिशान गाडी असा अदांजे सव्वादोन लाख रु. किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
     
या कारवाईत सहा. पो.नि.प्रविण सांळुखे, पोहेकॉ दिपक ठोंबरे, पोना.अरुण पाटील, पोना.शरद जाधव, पोना.प्रशांत देसाई, पोशि.आलमगीर लतीफ, पोशि.अमोल सावंत, पोना.विनय माळी यांनी सहभाग घेतला होता. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिपक ठोंबरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments