Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यात रिन्यू पॉवरकडून २५० पीपीई किटचे वाटप

विटा (प्रतिनिधी) : विट्यात रिन्यू  पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून २५० पीपीई कीट ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यात आली. तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्याहस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अनिल लोखंडे उपस्थित होते.

सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या रि न्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात सामाजिक योगदान देण्यात आले आहे. आज शुक्रवारी तहसीलदार ऋषीकेत शेळके आणि संस्थेचे वरिष्ठ अधिकारी सचिन हसबे यांच्या उपस्थितीत प्रशासनाला मोठी मदत देण्यात आले.  त्यानुसार विट्यातील ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी या संस्थेने लाखो रुपयांचे पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्याहस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे यांच्यासह आरोग्य विभागातील सेवकांकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. तसेच विटा पोलीस ठाण्यासाठी देखील पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्याकडे फेस शिल्ड सुपूर्द करण्यात आले. कोरोनाच्या काळात रि न्यू पॉवरच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments