Daily Mahasatta

Daily Mahasatta

मंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते बंधाऱ्याचे लोकार्पण

पलूस : पाणी पूजन प्रसंगी डॉ. विश्वजीत कदम, महेंद्र आप्पा लाड, तहसीलदार निवास ढाणे, विजय पवार, बजरंग जाधव, जावेद शिकलगार

पलुस (अमर मुल्ला) : येरळा नदीवरील जलयुक्त शिवाय योजनेतून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा व पाणी पूजनाचा कार्यक्रम राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यातर्फे संपन्न झाला. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड, तहसीलदार निवास ढाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव ,मंडल अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कदम म्हणाले, येरळा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचा उपयोग शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. येरळा नदीत पिण्याच्या पाण्यासाठी असणारा आंधळी गावच्या हद्दीतील जॅकवेल दुरुस्तीसाठी सोनहिरा फाउंडेशन च्या वतीने चार लाख रुपयांचा धनादेश ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. तसेच जॅकवेल चे काम लवकर पूर्ण करून घ्यावे. विकास कामांची गती थोडीशी कमी झाली असली तरी राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या सुधारत आहे. त्यामुळे विकास कामे जलद गतीने होतील.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनासारख्या महामारीशी आपण सर्वजण लढत आहोत. सरकर महामारी पासून संरक्षण व्हावे यासाठी वेगवेगळ्या उपायोजना राबवत आहे . त्याच बरोबर पोलीस ,महसूल विभाग , आरोग्य विभाग व आशा वर्कर यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. आपत्ती व्यवस्थापन समिती ही सहभाग घेऊन काम करत आहेत. शासनाच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे मास्क, सॅनेटाझरचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये. लहान मुलांची काळजी घ्यावी. दोन ते तीन महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे .तरी सर्वांनी दक्षता घ्यावी असे आव्हान केले.

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बजरंग जाधव ,सरपंच अमित चव्हाण, उपसरपंच माणिक माने, ग्रामसेवक पवार मॅडम ,अक्षय पवार,सुवर्णा शिंदे, लतिका रास्कर,जैनब शिकलगार,छाया दिवाण, प्रकाश माने, विजय पवार, पोपट पाटील, अशोक कदम, जावेद शिकलगार, अर्जुन माने, अभिजीत माने, ब्रह्मानंद माने ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
-----------------
चार लाखांचा धनादेश 
आंधळी गावच्या हद्दीतील जॅकवेल दुरुस्तीसाठी
सोनहिरा फाउंडेशन तर्फे चार लाख रुपयांचा धनादेश मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते आंधळी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला.

Post a Comment

0 Comments