Daily Mahasatta

Daily Mahasatta

विश्वजितेश फौंडेशनकडून आशा वर्करना छत्रीची भेट

विटा (प्रतिनिधी) : विश्वजितेश फौंडेशनच्या वतीने मा. आ. मोहन शेठ (दादा) कदम व मा. प्राचार्य शिवाजीराव कदम यांच्या वाढविसाच्या निमित्ताने खानापूर तालुक्यातील आरोग्य विभागातील आशा वर्कर आणि अर्ध वेळ परिचारीका यांना छत्रीचे वाटप विटा येथे करण्यात आले.

विश्वजितेश फौंडेशनच्या वतीने संपुर्ण जिल्हाभर मा. आ. मोहन शेठ (दादा) कदम व मा. प्राचार्य शिवाजीराव कदम यांच्या वाढविसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातील एक भाग म्हणून, गेली वर्षभर करोनाच्या भयंकर संकटामध्ये अगदी गाव पातळीवर अत्यंत मोलाचे कार्य करणा-या आशा वर्कस यांचे कौतुक युवा नेते डॉ. जितेश (भैया) कदम यांच्या मार्फत करण्यात आले ते पुढे म्हणाले कि, तुमचे महत्वाचे प्रश्न मा. ना. डॉ. विश्वजीत उर्फ बाळासहेब कदम राज्यमंत्री, कृषी, सहकार मंत्री यांच्या मार्फत शासन दरबारी मांडून तुम्हाला न्याय देण्याची मी हमी देत आहे. त्याच प्रमाणे तुम्ही जे कार्य करता त्याचा, संपूर्ण समाजाला उपयोग होत आहे हे आम्ही शासनाच्या लक्षात आणून देऊ. तसेच तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. शेवटी ते म्हणाले की आम्ही तुम्हाला तुमचे हक्क मिळवून देऊ.

यावेळी अमित पारेकर यांनी विश्वजितेश फौंडेशन यांचे सामाजिक कार्य किती व्यापक आहे याची सर्वांना जाणीव करुन दिली.  महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस मा. इंद्रजित साळुंखे म्हणाले कि, आशा वर्कर यांच्या कामाचा व्याप फार मोठा आहे, त्यांना योग्य तो पगार मिळाला पाहिजे.  यावेळी बोलताना सेवा दल अध्यक्ष मा. अजित मुळीक यांनी डॉ. जितेश (भैया) कदम यांच्या कामाचा तपशील सर्वांपुढे मांडला संपुर्ण जिल्हाभर कशा प्रकारे ते काम करतात त्याचे कौतुक केले.

शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्यावतीने मा. विठ्ठल साळुंखे यांनी आशा वर्कस यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सुरेश (काका) पाटिल म्हणाले मोहन शेठ (दादा) यांचे कार्य फार मोठे आहे. तसेच खानापूर तालुका आय. काँग्रेस अध्यक्ष मा. रविंद्र (आण्णा) देशमुख म्हणाले मोहन शेठ (दादा) कदम, स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे खानापूर तालुक्यासाठी फार मोठे योगदान आहे. अनेक संस्था कार्यालये त्यांनी उभी केली आहेत. आज जो विकास दिसतो आहे तो त्यांच्या मुळेच. पुढे ते म्हणाले कि, आशा वर्कस यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवट पर्यंत प्रयत्न करु कारण आशा वर्क यांचे काम समाज उपयोगी आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दत्तात्रय कोळेकर पोलीस अधिकारी यांनी विश्वजितेश फौंडेशनचे आभार मानले. आशा वर्कस यांचे कार्य कोरोना मध्ये किती महत्वाचे होते याची जाणीव करुन दिली.

याप्रसंगी पोलीस अधिकारी मा. दत्तात्रय कोळेकर साहेब, आरोग्य अधिकारी मा. डॉ. अविनाश लोखंडे, खानापूर तालुका आय काँग्रेस अध्यक्ष मा. रविंद्र (आण्णा) देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस मा. इंद्रजित साळुंखे. नगरसेवक विटा मा. सुमित (भैया) गायकवाड , श्री. प्रमोद जाधव, श्री. विजय मुळीक, श्री . अभिजित सुर्यवंशी, श्री. दत्ता ननवरे, श्री. अजित मुळीक, श्री. महाविर भोर, श्री. नितीन मोहिते, श्री. महेश जगताप, श्री. सुहास मुळीक श्री. रमेश शिरतोडे, आदी मान्यवर व सर्व आशा वर्कर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजू राजे यांनी केले तर आशा सेविका यांच्या प्रतिनिधी  सुरेखा जाधव यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments