Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात ट्रकच्या धडकेत एकजण ठार

कुपवाड (प्रमोद अथनिकर)

कुपवाड मधील औधोगिक वसाहती मध्ये ट्रक आणि
दुचाकी  मध्ये झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे.
   पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार कुपवाड औधोगिक वसाहती मध्ये हिरो स्प्लेंडर मोटर सायकल नंबर ( एम एच १३ डीडी ७४८३)  व ट्रक नंबर ( एम एच ११ एम ६७१४) या दोन वाहनात भीषण धडक झाली.  या अपघातात दुचाकी चालक दत्तात्रय प्रभाकर गवळी (वय २४) वर्षे धंदा खाजगी नोकरी रा.स्वामी मळा,स्मशानभुमी जवळ कुपवाड, मुळ रा. आरळी ता मंगळवेढा याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक अनिल अशोक जाधव वय ४० रा. गोठन गल्ली मिरज यास कुपवाड पोलीसानी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पो ना बोंद्रे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments