Daily Mahasatta

Daily Mahasatta

मदनी ट्रस्टकडून मुख्यमंत्र्यांना आरक्षणासाठी १० हजार पोस्ट कार्ड पाठवणार

सांगली (प्रतिनिधी) : मदनी चॅरिटेबल ट्रस्टकडून आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने १० हजार पोस्टकार्ड सांगली शहरातून पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समितीने दिलेल्या शिफारशीत भारतातील मुस्लिम समाज हा अत्यंत मागास आहे. त्यांच्या सर्वांगीण प्रगती साठी उपाययोजना करण्याच्या शिफारशी यापूर्वीच्या केंद्र सरकारला केल्या आहेत. परंतु कुठल्याही सरकारने मुस्लिमांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू या राज्याच्या धर्तीवर 5 टक्के आरक्षण मिळावे यासाठी राज्यसरकरला पोस्टकार्ड पाठवण्याची जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेचा पहिला भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावातून 10 हजाराहून अधिक पोष्टकार्ड मधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे पाठवण्यात आली. सरकारला पोस्ट कार्ड पाठवण्याची मोहीम सांगली शहरातून सुरू करण्यात आली असून या कार्यक्रमाचे संयोजन मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद  महासचिव सुफियांन पठाण यांनी केलं*.सांगली मधील पोस्ट कार्यालयातुन सरकारला पोस्ट कार्डे पाठवून देण्यात आली.
 भारत देशातील मुस्लिम समाजाची परिस्थिती दलितांपेक्षाही अंत्यत वाईट असल्याचं न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समितीने म्हटलं आहे. आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या वापर केवळ मतांसाठीच करून घेण्यात आला आहे. केवळ धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारून निवडणुका आल्या की, राजकीय पक्षाची नेतेमंडळी मते घेतात. मात्र त्याना आरक्षण देण्याचा कोणताही प्रयत्न करत‌ नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात अनेक संघटनांनी पोस्ट कार्डे पाठवून प्राथमिक स्वरूपात जनजागृती मोहिमेला प्रारंभ केला आहे. घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी या प्रश्नांचे महत्व पटवून दिले आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या पुढचा टप्पा म्हणून निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा का इतर कोणता लढ्याचा मार्ग अनुसरायचा?याचा निर्णय समाजातील मान्यवरांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात येणार आहे.
लवकरच आरक्षणासाठी सांगली जिल्ह्यात मुस्लिम समाजाचा मेळावा घेऊन लढ्याचे रणशिंग फुंकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments