Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात २ कोटी ८० लाखांच्या कामांना मान्यता : विश्वनाथ डांगे

इस्लामपूर (हैबत पाटील) : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत इस्लामपूर नगर परिषदेस जाहीर झालेल्या बक्षिसाच्या रकमेतून २ कोटी ८० लाखाच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती नगरपालिकेचे स्वच्छता व आरोग्य सभापती विश्वनाथ डांगे यांनी दिली. 

ते म्हणाले," इस्लामपूर नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये १५ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले होते. या रकमेतील काही निधी विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक कामे स्वच्छता व आरोग्य विभागाच्या संबंधित आहेत. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पारितोषिक मिळवण्यासाठी पालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक,नगरसेविका आजी-माजी आरोग्य सभापती, आजी- माजी मुख्याधिकारी, नगरपालिकेचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच इस्लामपूर शहरातील सर्व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नातून नगरपालिकेला हे यश मिळाले होते. बक्षीस मिळलेल्या निधीतून विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी व उर्वरित निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले. निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ना. जयंत पाटील साहेब व महाविकास आघाडीच्या सरकारचे आभारी आहोत." 

ते म्हणाले," मंत्री तलावासाठी अजून ज्यादा रकमेची गरज आहे. ती रक्कम व उर्वरित बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. शासन निर्णयाप्रमाणे शहरातील सर्व विकास कामे आमच्या राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीकडून वेळेत पूर्ण केली जातील. सध्या पावसाळ्याच्या तोंडावर मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळ्यातील साथीच्या आजारांच्या अनुषंगाने जंतुनाशके फवारणी, औषधे व इतर सर्व साधन सामग्रीची प्रशासनाने तयारी केली आहे. सध्या जो निधी मिळत आहे त्यातून खरेदी करण्यात येणारी यंत्रणा व विकासकामाने इस्लामपूर शहराचे आरोग्य सुधारण्यासाठी व आरोग्य यंत्रणा बळकट होण्यास मदत होणार आहे." असे ते म्हणाले.

अशी आहेत मंजूर विकास कामे ...!
मंत्री तलावा सुशोभीकरणासाठी ६३ लाख ३८ हजार ९८९. ट्रॅक्टर एसटीपी पंप - ६ लाख ७००.
२ सीटचे व सिंगल सीट मुतार्या - ४२ लाख २० हजार.४ सीटचे फिरते शौचालये- ४४ लाख.
ट्रॅक्टर ट्रॉली - २६ लाख १२ हजार १३६ धूर फवारणी मशीन - ४ लाख ६० हजार ७९२
टॉयलेटच्या स्वतंत्र चार ब्लॉकसाठी - ९३लाख बत्तीस हजार ११७ असा निधी असणाऱ्या कामांना दोन कोटी ७९ हजार ४४ हजार ७९४ रुपये खर्चासह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एका व्यक्तीसाठीची व दोन व्यक्तींसाठीची मुतारी प्रत्येकी दहा ठिकाणी असतील. ४ सिट्ची फिरती शौचालये दहा नग असणार आहेत.

Post a Comment

0 Comments