Daily Mahasatta

Daily Mahasatta

शेतमजूराच्या खून प्रकरणात दोघांना अटक

कडेगाव (सचिन मोहिते) : कडेगाव तालुक्यातील तडसर येथे अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन धनाजी भिमराव कोळी (वय ४५ ) या शेतमजुराचा खून केला होता. याप्रकरणाचा छडा लावत चिंचणी वांगी पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. हा खून पैशाच्या देण्याघेण्यातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवार ता. १ रोजी सायंकाळच्या सुमारास तडसर हद्दीत माळी वस्ती कासार डीपी जवळ तडसर ते वांगी रोडलगत ऊसाच्या शेतात सदर गुन्हयातील मयत धनाजी भिमराव कोळी वय ४५ वर्षे याचे डोक्यात अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन खून केला होता. याबाबत तानाजी कोळी यांनी वर्दी दिली होती. सपोनि संतोष गोसावी यांनी गुन्ह्यातील आरोपीबाबत काहीही माहीती नसताना अत्यंत शिताफीने गोपनीय तसेच तांत्रिक कौशल्याचे आधाराने नेमका ठाव ठिकाणा शोधून अज्ञात आरोपी बाबत उपयुक्त माहीती काढून त्यानंतर दोन पथके तयार करून आज ११ वाजताच्या सुमारास सागरेश्वर परिसरात उभ्या पावसात आरोपींचा शोध घेवून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींची नावे १) पृथ्वीराज ऊर्फ किशोर बाजीराव पाटील वय ३० वर्ष २) रितेश राजु थोरात (१९ वर्षे) या दोघांना अटक केली असून त्यांचे सहकारी ३) शब्बीर जहाँगीर शेख वय१९ वर्षे, ४) कुणाल सतिश सवणे (वय १८ वर्षे ) रा. नागराळे ता. पलूस जि. सांगली यांना अटक करणे बाकी आहे.

सदरचा खून हा यातील आरोपी पृथ्वीराज ऊर्फ किशोर बाजीराव पाटील याचे ८० हजार रुपये मयत धनाजी कोळी यांनी दिले नाहीत. तसेच पैसे देणार नाही काय करायचे ते कर असे म्हणाला होता, यावरुन आरोपी व मयत यांचेत दीड महिन्यापूर्वी जोरदार भांडणे झाली होते. याचा राग मनात धरुन आरोपी पृथ्वीराज ऊर्फ किशोर पाटील व रितेश राजु थोरात यांनी मोटर सायकलचे शॉकॉपसरने मयत धनाजी याचे डोकीत पाठीमागे व कपाळावर गंभीर वार करून खून केला आहे. सदर वेळी शब्बीर जहाँगीर शेख व कुणाल सतिश सवणे यांनी मयत कोळी या मारहाण करुन आरोपी पृथ्वीराज पाटील आणि रितेश थोरात यांना सहकार्य केले आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि संतोष गोसावी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments