Daily Mahasatta

Daily Mahasatta

आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरजेत चक्काजाम आंदोलन

मिरज (प्रतिनिधी) : ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्यसरकारच्या नाकर्त्यापणा मुळे रद्द झाले आहे, असा आरोप करत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने 26 जुन रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून  मिरज विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाच्यावतीने  २६ जून रोजी आनंद नर्सिंग होम जवळ, सांगली रोड , मिरज येथे आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.            
             
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ श्री सुरेश भाऊ खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्राजक्ता कोरे, भाजप जिल्हाअध्यक्ष श्री दीपक बाबा शिंदे, अनुसूचित जाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर, सुरेश बापू आवटी, प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा  श्री जयगोंडा कोरे , नगरसेवक गणेश माळी ,नगरसेवक निरंजन आवटी, माजी महापौर संगीताताई खोत, महादेव अण्णा कुरणे, संभाजी नाना मेंढे, अरुण राजमाने,किरण बंडगर, काकासाहेब धामणे, युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.

मोर्चा चे संयोजन जयगोंडा रायगोंडा कोरे, प्रदेश सचिव भाजप ओबीसी मोर्चा, मिरज शहर अध्यक्ष श्री बाबासाहेब आळतेकर, श्री राजेंद्र नातू, मिरज शहर अध्यक्ष ओबीसी मोर्चा श्री महेश फ़ोडे श्री बाळासाहेब अस्वले, मिरज तालुका अध्यक्ष श्री शंकर शिंदे आदींनी केले.

Post a Comment

0 Comments