Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत पुरपट्ट्यातील नागरिकांनी स्थलांतरित व्हावे : महानगरपालिकेकडून आवाहन : उपायुक्त राहुल रोकडे यांनी नागरिकांशी साधला संवाद

सांगली (प्रतिनिधी) : संभाव्य पावसाळा गृहीत धरीत कृष्णा काठच्या पुरपट्ट्यात महापालिकेकडून नागरिकांना पूर येण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेचे आवाहन करण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांनी पुरपट्ट्यातील नागरिकांशी संवाद साधला.

मागील दोन वर्षात विशेष करून २०१९ मध्ये आलेल्या महापुरात शेरीनाल्याच्या बाजूचा मगरमच्छ कॉलनी, सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागात पाहिल्यादा पाण्याचा शिरकाव होतो. ऐनवेळी पाणी वाढल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यास मोठी अडचण आली होती. हा अनुभव लक्षात घेता यंदाच्या संभाव्य पुरस्थितीचा अंदाज घेता मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी पूर पट्ट्यातील आणि पहिल्यांदा पुरामुळे बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेबाबत सूचित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त अशोक कुंभार, मुख्यअग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, धनंजय कांबळे, प्रणिल माने, वैभव कुदळे, गणेश माळी, किशोर कांबळे आदींनी शेरीनाल्याच्या बाजूचा मगरमच्छ कॉलनी, सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागात फिरून नागरिकांशी संवाद साधला तसेच योग्यवेळी स्थलांतरित व्हावे आणि पर्यायी व्यवस्था शोधावी तसेच नुकसान टाळावे असे आवाहन यावेळी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments