Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असून आज एकाच दिवशी १०८९ इतके इतक्या रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर दिवसभरात २३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. सुमारे सहाशे ते सातशे पर्यंत खाली गेलेला कोरोनाग्रस्तांचा आकडा आता दररोज एक हजार पेक्षा वर गेला आहे. म्युकरमायकोसीसचे देखील आज नवीन ५ रुग्ण आढळून आले असून यापैकी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ९०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सांगली जिल्ह्यात आज आढळून आलेले तालुकानिहाय रुग्ण पुढील प्रमाणे : आटपाडी ७१,  जत ३५, कडेगाव ५८, कवठेमंकाळ ५७, खानापूर ८२, मिरज ८७, पलूस १२६, शिराळा ६९, तासगाव ६२, वाळवा २१६ तसेच सांगली शहर १४७ आणि मिरज शहर ४९ असे सांगली जिल्ह्यात आज एकूण १०८९ रुग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments