Daily Mahasatta

Daily Mahasatta

भविष्यात ऑक्सिजन ची कमतरता भासू नये याची काळजी घ्या : उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी

इस्लामपूर (हैबत पाटील) : भविष्यात ऑक्सिजन ची कमतरता भासू नये याची आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर वृक्ष लावणे, त्याचे जतन करणे, काळाची गरज आहे.सध्या माणूस हा विविध संकटांना सामोरे जातोय , त्याचे आत्मभान ठेऊन  प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लावून ती जतन करण्याची  जबाबदारी स्वीकारली पाहिजे,  असे मत पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील शासकीय धान्य गोदामच्या आवारात डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
 या वेळी आंबा, पिंपळ, वड, चिंच, करंज आदी व इतर विविध प्रकारच्या जातीचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे,उप विभागीय अधिकारी विजयसिंह देशमुख,तहसीलदार रवींद्र सबनीस, अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पुरवठा निरीक्षक बबन करे,रास्त भाव दुकानदार, मंडल अधिकारी,सचिन सगर,मंडल अधिकारी प्रफुल्ल माळवदे, तसेच तलाठी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments