Daily Mahasatta

Daily Mahasatta

चिंचणी - वांगी पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण

: युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत
यांच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा

कडेगाव (सचिन मोहिते )
युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत
यांच्या माध्यमातून आज शनिवार ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत चिंचणी - वांगी पोलिस ठाणे येथे फळझाडांची लागवड करण्यात आली.

कोरोनाच्या महामारीत ऑक्सीजनचा पडलेला तुटवडा याची दखल घेत व आजच्या काळात जागतिक पर्यावरणाचे रक्षण करणे हि काळाची गरज ओळखुनच युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिलने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण देशभर वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी , चिंचणी -वांगी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी पोर्णिमा शृंगारपुरे, सांगली जिल्हा मीडिया प्रभारी सचिन मोहिते, अतुल जाधव, पंकज औताडे तसेच युनिव्हर्सल ह्युमन राइट कौन्सिंलचे तालुका अध्यक्षा आरती होलमुखे, ज्योतिराम होलमुखे, पोलिस हावलदाल अधिकराव वनवे ,चन्ने यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments