Daily Mahasatta

Daily Mahasatta

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जत मध्ये पेट्रोल पंपासमोर आंदोलन

जत (सोमनिंग कोळी) : काय रे बाबा मोदी कसला रे तुझा खेळ..!, स्वतः झाले मरण अन महागले पेट्रोल डिझेल..!,लुटेरी मोदी सरकार, पेट्रोल हुआ सौ पार.. !, पेट्रोल महंगाई से जनता बेहाल,मोदी बस्स करा जनतेची लुटमार ! या घोषणाबाजीत जतमध्ये केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात पेट्रोल पंपांसमोर आंदोलन करुन केंद्रातील मोदी सरकारचा जत तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे.

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे केंद्रात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असतांनाही देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमतींवर त्याचा परिणाम होवू दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. यामुळे इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही मोदी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाहीत. अशी प्रतिक्रिया आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.

आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अप्पराय बिराजदार, कार्याध्यक्ष नाना शिंदे, माजी सभापती बाबासाहेब कोडग,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,युवराज निकम,अशोक बनेनवर, महादेव कोळी,निलेश बामणे,आकाश बनसोडे,यश सावंत,राजू यादव यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments