Daily Mahasatta

Daily Mahasatta

युवक राष्ट्रवादीच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी विराज नाईक

मांगले (राजेंद्र दिवाण) : शिराळा विधानसभा मतदार संघाचे युवा नेते विराज मानसिंगराव नाईक यांची सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.
 
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात निवडीचे पत्र विराज नाईक यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. मेहबूब शेख यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील,यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.  

यावेळी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक, माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे गट नेते शरद लाड, युवकचे माजी अध्यक्ष भरत देशमुख आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments