Daily Mahasatta

Daily Mahasatta

येडेनिपाणी चा आदर्श ठेऊन नियोजन करा : मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी

इस्लामपूर (सुर्यकांत शिंदे) : मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी वाळवा तालुक्यातील सर्वात जास्त कोरुना रुग्ण असलेल्या पाच गावांना भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने साखराळे, साटपेवाडी, वाळवा ,भडकंबे,बागणी इत्यादी गावांचा समावेश होता.यावेळी  जि. प. सदस्य पं.स. सदस्य , सरपंच , उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व जास्त पॉझिटिव्हिटी असणाऱ्या गावांचा आढावा घेण्यात आला, या सर्व गावांमध्ये खालील सूचनांची अंमलबजावणी करणे बाबत आदेश दिले.

पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जास्त संपर्कातील म्हणजेच हाय रिस्क लोकांची यादी सविस्तर घ्यावी ती प्रत्येक केस पाठीमागे पंधरा पेक्षा खाली असू नये.एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या १०० मीटर परिक्षेत्रातील सर्व व्यक्तींची तपासणी करून घेण्याबाबत सूचना दिल्या. यामुळे  समोर न येणारे केसेस सापडण्यासाठी मदत होईल व त्यांच्या पासून होणारा प्रादुर्भाव थांबेल.

खासगी डॉक्‍टरांच्या कडून प्राप्त होणाऱ्या ILI / SARI नावांची दररोजचा दररोज कोरोना चाचणी करून त्या संदर्भातील पुढील कारवाई करावी.
पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील  म्हणजेच हाय रिस्क व लो रिस्क लोकांचे गृह अलगीकरण व्यवस्थित करणे बाबत सूचना दिल्या. जे लोक ऐकत नाहीत अशांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.ज्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरांमध्ये गृह विलगीकरणची सोय नाही अशा सर्व लोकांना संस्थात्मक विलगीकरण करून दक्षता कमिटीची मदत घेण्याच्या सूचना दिल्या. गृह अलगीकरणमध्ये असलेल्या रुग्णांच्या   मूलभूत गरजा व गोष्टींची मदत ग्रामपंचायत व इतर सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन कराव्यात असे आवाहन करण्यात आले.ज्या गावांमध्ये जास्त कोरोना रुग्ण आहेत अशा गावांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंध घालून विनाकारण फिरणाऱ्या व गावामध्ये येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवावे.

 जितेंद्र डुड्डी यांनी येडेनिपाणी ग्रामपंचायतीने केलेल्या  नियोजनाबाबत त्यांचे अभिनंदन केले. येडेनिपाणी ग्रामपंचायत हाय रिस्क असलेल्या लोकांचे जास्तीत जास्त टेस्टिंग करत आहे, गावांमध्ये विनाकारण कुणाला फिरू देत नाहीये, विलगीकरण केले जात आहे, बँक, डेअरी यांच्या बाबतीत अत्यंत काटेकोरपणे नियोजन केलेला आहे.तहोम डिलिव्हरी दिली जात आहे. त्यामुळे गावातील पूर्ण संख्या कमी होत आहे. याबद्दल सरपंच व त्यांचे टीमचे अभिनंदन केले.

 वाळवा तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे , पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील सर्व संबंधित वैद्यकीय अधिकारी ग्रामविकास अधिकारी तलाठी व इतर शासकीय कर्मचारी यांना वरील प्रमाणे  कार्यवाही बाबत सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments