Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपुरात होणार ऑनलाइन बाल योगा कार्यशाळा

इस्लामपूर (हैबत पाटील) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जयंत बालभवनची बालयोगा कार्यशाळा १८ जून रोजी होणार असल्याची माहिती संगीता शहा यांनी दिली. आंतररार्ष्ट्रीय योग दिंनानिमित्त संपूर्ण जगामध्ये योग शास्त्रावर आधारित विविध उपक्रम आयोजित केले जातात. मोठ्यांसोबत लहान मुलांपर्यंत योगा प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे हे ओळखून जयंत बालभवनच्या वतीने शहरात प्रथमच ऑनलाइन बाल-योग ही मोफत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. महाराष्ट्रची पहिली बालयोगिनी आणि ठाणे योग रत्न म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या श्रुति शिंदे यांना या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती जयंत बालभवनच्या अध्यक्षा संगीता शहा यांनी दिली.

  विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाला मोठे महत्त्व आहे. खेळातील सहभाग शारीरिक आणि मानसिक विकासास खूप मदत करतो. सध्या सर्वत्र कोरोंनाचा प्रभाव असल्याने शाळा बंद आहेत त्यामुळे नियमितपणे खेळ खेळणे बंद झाले. तसेच मुलांच्या ऑनलाइन क्लासेसमुळे मनावरील वाढता तान-तनाव कमी करण्यासाठी पालकांनी मुलांना योगा करण्यास प्रवृत्त केल्यास शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक विकास सहज साधला जाईल अशी भावना संगीता शहा यांनी व्यक्त केली.

कोरोंनामुळे लहान मुलांना भविष्यात त्रास होवू नये यासाठी मुलांचे शरीर तंदुरुस्त हवे यावर योगा हा उत्तम उपाय आहे. लहान मुलांची अनेक आजारांशी लढण्याची क्षमता (इम्युनिटी पॉवर) वाढावी या उद्देशाने जयंत बालभवन यांच्यावतीने बाल-योग ही मोफत कार्यशाळा गुगल मिटच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

दिनांक १८ जून 2021 रोजी दु. 4 वा. बाल-योग कार्यशाळेत ६ वर्षे वयावरील लहान मुलींना व पालकांना सहभागी होता येईल. यामध्ये लहान मुलामुलींसाठी उपयोगी योगासने, प्राणायाम शिकविण्यात येतील. कार्यशाळेसाठी प्रवेश प्रक्रिया आणि संयोजन बालभवनच्या योग अध्यापक कविता शहा तसेच श्रद्धा कुलकर्णी, प्रतिभा शहा, राखी शहा, कावेरी कळेकर, लिना पटेल करीत आहेत. शहरातील लहान मुले व पालकांनी बाल-योग कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी 9860600155, 9373839388 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्षा संगीता शहा यांनी केले.

Post a Comment

0 Comments