Daily Mahasatta

Daily Mahasatta

स्वराज्याचा आदर्श घेवून वाटचाल करु : सरपंच रामदास साळुंखे

कवठेमहांकाळ (अभिषेक साळुंखे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याच्या पुढे आणलेल्या संकल्पनेतून आदर्श घेवून ग्रामपंचायतीच्या माफर्त कार्य करु असा विश्वास सरपंच रामदास साळुंखे यांनी व्यक्त केला.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ढालेवाडी 
ग्रामपंचायतच्या प्रांगणात शिवस्वराज्य गुढी चे सरपंच रामदास साळुंखे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तानाजी कोडग सर यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी बेदाणा व्यापारी वासुदेव जाधव,माजी सरपंच नानासाहेब कारंडे, रोजगार सेवक पोपट कोष्टी, सदस्य वसंत मोरे,प्रशांत आठवले,शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अवधूत साळुंखे, मुख्याध्यापक वाघमारे सर, हणमंत साळुंखे प्रकाश गुरव, सुहास आठवले, ग्रामसेवक क्षीरसागर, आरोग्य सेविका मनिषा साळुंखे,अशोक शिंदे, इंजिनीअर रोहित साळुंखे , बाळासाहेब कोष्टी आदिंची उपस्थिती होती.

6 जून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून याला विशेष महत्व आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर व त्यांनी ज्या पध्दतीने राज्यकारभार केला त्याचा आदर्श घेवून त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी शिवस्वराज्य गुढी उभारली आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.

Post a Comment

1 Comments