Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

: एकाच दिवसात ९४९ रुग्ण
सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज बुधवार २३ रोजी ९४९ रुग्ण तसेच अन्य जिल्ह्यातील २१ रुग्ण असे एकूण ९७० रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा हादरून गेले आहे.

राज्यासह सांगली जिल्ह्यातील  लाकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना आटोक्यात येईल अशी शक्यता होती.  मात्र सांगली जिल्ह्यातील कोरोना  नियंत्रणात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आज एकाच दिवशी ९७० रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच दिवसभरात २५ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढील प्रमाणे आटपाडी ९,  जत ४५, कडेगाव ३५, कवठेमंकाळ  ३२,  खानापूर ५७, मिरज १०१,  पलुस ९८,  शिराळा ८१, तासगाव ४८, वाळवा २२९, तसेच  सांगली शहर १७६ आणि मिरज शहर ३८ असे सांगली जिल्ह्यातील ९४९ रूग्ण आढळून आले आहेत.

Post a Comment

0 Comments