Daily Mahasatta

Daily Mahasatta

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून दत्तात्रय लांघी यांनी पदभार स्वीकारला

सांगली (प्रतिनिधी) : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून दत्तात्रय लांघी यांनी आज पदभार स्वीकारला.

श्री लांघी यांनी आज मनपा मुख्यालयात येऊन आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी नूतन अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांचे स्वागत केले. यानंतर अतिरिक्त आयुक्त लांघी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. दत्तात्रय लांघी हे अहमदनगर जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची नुकतीच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाकडून नियुक्ती झाली होती. लांघी यांनी अनेक नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून आणि 2 ठिकाणी जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणुनही कामकाज पाहिले आहे. 

त्यांची सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज दत्तात्रय लांघी यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. महापालिका क्षेत्रात माझी वसुंधरा, स्वच्छ सर्व्हेक्षण तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मनोदय नूतन अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments