Daily Mahasatta

Daily Mahasatta

आशा सेविकांचे कार्य कौतुकास्पद : माजी सरपंच विजय पाटील

मांगले (राजेंद्र दिवाण) : कोरोना संकटकाळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे सेवाकार्य करणाऱ्या आशा सेविकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच, युवा उद्योजक विजय पाटील यांनी केले.

मांगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांच्या कामाची दखल घेऊन श्री मंगलनाथ उद्योग समूहाच्या वतीने कोविड योद्धा सन्मानपत्र व संसार उपयोगी साहित्य देऊन गैरव करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
            विजय पाटील म्हणाले, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन मिळून अहोरात्र विविध उपाययोजना राबवित आहे़ याच पार्श्वभूमीवर आशा वर्कर  जोखीम पत्करून गावागावात सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. तसेच कोरोना लसीकरण मोहीम मध्ये सुद्धा  आशा वर्कर हे उल्लेखनीय योगदान देत आहेत. अत्यंत कमी मानधनात कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अविरतपणे सेवाकार्य  करणार्या आशा वर्कर ह्या खर्या अर्थाने कोरोना योद्धा असुन त्यांचे हे कार्य खरोखर प्रशंसनीय आहे. 

प्रारंभी मांगले प्राथमिक आरोग्य विभागातील तीस आशा सेविका, कर्मचारी यांचा कोरोना योध्या प्रमाणपत्र, व संसार उपयोगी किट देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय तडाखे यांनी तर आभार राजेंद्र गवळी यांनी मानले.
          
यावेळी लोकनियुक्त सरपंच मीनाताई बेंद्रे, आरोग्य अधिकारी डॉ. जयसिंग पवार, डॉ. महम्मद फिरजादे, डॉ.सुमित कांबळे, प्रा. भिमराव गराडे-पाटील, महादेव चौगुले, राहुल चरापले, प्रा. दीपक तडाखे, ज्ञानदेव शिंदे, विजय गराडे, राजेंद्र दिवाण,  रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments