Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

सांगलीत बंद पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर

: मनपा अग्निशामक विभागाने तातडीने घेतली धाव 

सांगली (प्रतिनिधी) : सांगलीच्या संजयनगरमध्ये बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती मिळताच मनपा अग्निशामक विभागाने तातडीने धाव घेऊन खबरदारीचे सर्व उपाययोजना केल्या. तसेच पेट्रोल बाजूला करणेचे काम सुरू करण्यात आले आहे.

संजयनगर येथे विरुपक्ष पेट्रोलपंप आहे. तो गेली अनेक महिन्यापासून बंद आहे. आज सकाळी या टाकीच्या व्हॉल्व्ह मधून पेट्रोल बाहेर येत असल्याने एकच खळबळ माजली. तेथील महापालिका कर्मचाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे आपल्या ताफ्यासह तातडीने दाखल झाले. यावेळी व्हॉल्व्ह आणि आजूबाजूची पाहणी करीत पेट्रोल वरती कसे येत असावे याबाबत तपासणी सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर इंडियन ऑइल डेपोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. संजयनगर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. पेट्रोल बाहेर येऊ लागल्याने परिसरात खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments