Daily Mahasatta

Daily Mahasatta

शिवप्रताप मानव कल्याणचा आदर्श सर्व संस्थांनी घ्यावी : डॉ. जितेश कदम

विटा (प्रतिनिधी) : शिवप्रताप मानव कल्याण संस्था, विटा. यांच्या वतीने नाभिक समाजातील समाज बांधवांना अन्न धान्याचे व घरगुती साहित्यांचे किट वाटप मा. युवा नेते डॉ. जितेश (भैया) कदम, मा. संतोष भोर, उपविभागीय दंडाधिकारी विटा व सोमनाथ साळुंखे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाभिक समाज) यांचे हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या भयंकर संकटामध्ये सर्व व्यवसाय शासनाने बंद केले आहेत. त्याचा जास्त फटका हा सलून व्यवसायकांना बसला आहे. त्यांचा संपुर्ण व्यवसाय बंद झाला आहे. ग्रामीण व शहरी भागातील नाभिक बंधू वर उपास मारीची वेळ आली आहे. त्यांना मदत म्हणून शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या वतीने व मा. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आहे. या किट मध्ये एकुण वीस वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रसंगी बोलताना युवा नेते डॉ. जितेश (भैया) कदम म्हणाले कि नाभिक समाज आज मोठया अडचणीत आहे , त्यांना आज मदतीची गरज आहे हे ओळखून शिवप्रताप ग्रुप चे प्रमुख श्री. विठ्ठल साळुंखे यांनी हे वाटप केले. हे काम सामाजीक बांधीलकी जपणारे आहे. तसेच, शिवप्रताप मानव कल्याण संस्थेने कोरोना काळात सर्वांना मदत केल्या बद्दल शिवप्रताप ग्रुपचे कौतुक व अभिनंदन केले.

पुढे ते म्हणाले कि, सर्वांनी नियम पाळा, शासनाला सहकार्य करा असे आवाहन केले. मा. संतोष भोर साहेब (उपविभागीय अधिकारी) म्हणाले कि, शासन सर्वांना मदत करत आहे. प्रशासनआपणास सहकार्य करत आहे, तुम्ही प्रशासनाला मदत करा. पुढे ते म्हणाले, शिवप्रताप ग्रुप चे संस्थापक प्रतापशेठ (दादा) साळुंखे , विठ्ठल साळुंखे यांचे काम अभिनंदनीय आहे. त्यांची समाजाला मदत करण्याची भूमिका याचा आदर्श समाजाने घ्यावा असे म्हणाले. 
तसेच प्रा. सोमनाथ साळुंखे (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नाभिक समाज) म्हणाले, आमचा समाज आज खुप अडचणीत आहे. शासन पुरेशी मदत करत नाही. सध्या समाज बांधवांचे काम बंद झाले आहे. या अडचणीच्या काळात शिवप्रताप ग्रुप ची मदत ही लाखमोलाची आहे. नाभिक समाजाच्या वतीने त्यांनी शिवप्रताप ग्रुपचे आभार मानले व ते पुढे म्हणाले कि, हा कार्यक्रम प्रथमच महाराष्ट्रात घडत आहे. याचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा. 

याप्रसंगी प्रतिनिधी स्वरुपात काही मोजक्याच नाभिक बंधूना किट वाटप करण्यात आले व बाकी उरलेल्या बांधवांना त्यांच्या घरी पोहोच करण्यात आले आहे, असे विठ्ठल साळुंखे यांनी सांगीतले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सौ. सुलभा अदाटे. पंचायत समिती सदस्य श्री. संजय मोहिते. श्री. अमोल माळी. श्री. सयाजी घनवडे, श्री. शशिकांत अदाटे. श्री. विश्वास सुर्यवंशी, श्री नितीन खंडागळे, श्री. दत्ता गायकवाड, श्री. राजू गायकवाड, श्री. राजेंद्र निकम, श्री. सतीश सुर्यवंशी, श्री. विलास यादव, श्री. राजेंद्र शिंदे , श्री विठ्ठल घोरपडे, श्री. रमेश शिरतोडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रास्ताविक राजू राजे यांनी केले. तसेच, आभार रमेश शिरतोडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments