Daily Mahasatta

Daily Mahasatta

इस्लामपूरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

इस्लामपूर (सुर्यकांत शिंदे) : येथील किसाननगर मधील अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋषीकेश आशिष पाटणकर (वय-२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
    
याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ऋषीकेश हा एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मानसिक तणावातून ऋषीकेशने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. पो.उ. नि. शेडगे पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments