Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मध्ये ११८ फेरीवाले विक्रेत्यांची कोरोना चाचणी

कुपवाड (प्रतिनिधी) : कुपवाड मध्ये आज प्रभाग समिती क्र.३ मध्ये फेरीवाले, विक्रेते, दुकानदार व फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असता या मध्ये ६ जण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले.
   
रोजी प्रभाग क्र 3 मधील कुपवाड परिसरातील  आर. पी. पाटील  चौकात बाजारातील फेरीवाले, विक्रेते,दुकानदार फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये एकूण ११८ नागरिकांची चाचणी करण्यात आली असून यापैकी ६ नागरिक पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. कोरोना चाचणी करण्यास स्वतः सहा. आयुक्त दत्तात्रय गायकवाड  यांच्या  नेतृत्वाखाली मोहीम सूरू असून यावेळी डॉ. मयूर औधकर व त्याच्या टीम ने नागरिकाच्या तपासणी केल्या.

Post a Comment

0 Comments