Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात ९८८ पॉझिटिव्ह

सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात आज एकाच दिवशी ९८८ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच अन्य जिल्ह्यातील देखील ३० रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील  पॉझिटिव्हीटी रेट सुद्धा दहा टक्केच्या वर जात असल्याने  जिल्हा पुन्हा एकदा लॉकडाऊन च्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली तरी सांगली जिल्ह्यात मात्र कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे. काहीकाळ कोरोना रुग्णांची संख्या ६०० ते ७०० च्या आसपास पोहोचली होती. मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात एक हजार पेक्षा अधिक रुग्ण प्रत्येक दिवशी आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी देखील निर्बंध कठोर लावण्याचा इशारा दिला आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ८ हजार ५४४ रुग्ण उपचाराखाली आहेत. तर आज ७७२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण पुढील प्रमाणे : आटपाडी १८, जत ४०, कडेगांव १०४, कवठेमहांकाळ ३३, खानापूर ५६, मिरज ९२, पलूस ९३, शिराळा ६८, तासगाव ६५, वाळवा २३४, तसेच सांगली शहर १४१ आणि मिरज शहर ४४ असे जिल्ह्यात एकूण ९८८ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Post a Comment

0 Comments