Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाडात चोरी, एक लाखांचे दागिने लंपास

कुपवाड (प्रमोद अथणिकर) : कुपवाड परिसरातील उल्हासनगर येथे  अज्ञत चोरट्याने चोरी करून १ लाख १ हजार इतक्या किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे घटना घडली आहे
    
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कुपवाड परिसरातील आर.पी पाटील हायस्कूल जवळ उल्हासनगर येथे राहणारे जलाधर अशोक माने. (वय 35 ) रात्री झोपले असता अज्ञात चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील खोलीत प्रवेश करुन घरातील लोखंडी शोकेस कपाटातील 40 हजार रू किमंतीचे 2 तोळे सोन्याचे नेकलेस 40 हजार रू किमंतीचे 2 तोळे सोन्याचे मगंळसुत्र 15 हजार रू किमंतीचे 8 ग्रॅम सोन्याचे एक चेन ,4 हजार रू किमंतीचे 2 ग्राम सोन्याची एक अगंठी 2 हजार रू किमंतीचे पायातील चांदीचे एक पैजन जोड असे एकूण एक लाख एक हजार इतक्या किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत.

कुपवाड पोलीसानी चोराचा शोध सुरू केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोउनि काळेल हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments