Daily Mahasatta

Daily Mahasatta

मराठा आरक्षण गोलमेज परिषद निर्णायक ठरणार : विजयसिंह महाडिक

इस्लामपूर :मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत बोलताना विजयसिंह राजे महाडिक व इतर मान्यवर.

इस्लामपूर  (प्रतिनिधी) : मुंबई येथील मराठा आरक्षण गोलमेज परिषद निर्णायक ठरणार असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा पूर्ण झाला आहे. या गोलमेज परिषदेला मराठा आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समविचारी ४० पेक्षा जास्त मराठा संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी व मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी दिली.

इस्लामपूर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सरचिटणीस दिग्विजय मोहिते, जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना विजयसिंह महाडिक म्हणाले, मराठा आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून येत्या २५ जूनला नवी मुंबई माथाडी भवन येथे राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. या गोलमेज परिषद मध्ये महाराष्ट्रातील साधारणपणे ४० पेक्षा जास्त समविचारी मराठा  संघटना उपस्थित राहतील. कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथील जिल्ह्यांमध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून बैठका घेतल्या. भूमिका स्पष्ट केली प्रत्येक जिल्ह्यामध्ये समन्वय समितीचे कार्यकर्ते असतील किंवा विविध संघटनांचे पदाधिकारी असतील त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीचे विचार मांडले. किंबहुना काही संघटनांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात एल्गार करावा आणि उग्र आंदोलन करावं अशीही भूमिका घेतली आहे. आणि म्हणून आमचे धोरण असे आहे की ही गोलमेज परिषद आहे ही गोलमेज परिषद ही मराठा समाजाच्या मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबतीत एक दिशा देणारी असेल.

श्री महाडिक म्हणाले, या गोलमेज परिषदेला मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा देऊ केले ते खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह विविध मराठा समाजाचे आमदार आणि मराठा समाजाचे खासदार या परिषदेच्या माध्यमातून आम्ही बोललेले आहेत. वास्तविक मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्या बाबत चालढकल करण्याची आवश्यकता नव्हती, पण मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा नेत्यांचाच पूर्णपणे विरोध आहे आणि यापुढच्या कालावधीमध्ये जर त्यांना मराठा समाजाने जाब विचारला नाही तर परत आपण मागं जाऊ. आणि हे  समाजाच्या दृष्टीने अतिशय अडचणीचे आहे. तशी परिस्थिती येणार नाहीत अशा पद्धतीची धारणा या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही व्यक्त केली. विविध संघटनांनी विविध ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला. मला खात्री आहे की गोलमेज परिषद महाराष्ट्राला दिशा देणारी असेल. मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडल्या जातील त्यामुळे ही गोलमेज परिषद निर्णायक ठरेल.

Post a Comment

0 Comments