Daily Mahasatta

Daily Mahasatta

नियमांचे उल्लंघन, सहकार पॅनल वर गुन्हा दाखल

कडेगाव (सचिन मोहिते) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार पॅनेलच्या आयोजकांवर चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोसावी यांनी दिली आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारार्थ सहकार पॅनेल यांच्यावतीने देवराष्ट्रे येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या दरम्यान साडेतीनशे ते चारशे लोकांचा बेकायदेशीर जमाव जमत कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार पॅनलच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव बापुराव थोरात रा कालवडे ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Post a Comment

0 Comments