Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

मान्सूनपूर्व नालेसफाई कामाची उपायुक्त रोकडे यांच्याकडून पाहणी

सांगली (प्रतिनिधी) : सांगली शहरात सुरू असणाऱ्या आणि पूर्ण झालेल्या मान्सूनपूर्व नालेसफाई कामाची पाहणी उपायुक्त राहुल रोकडे यांनी करीत सुरू असलेल्या कामाबाबत सूचना केल्या.

मान्सूनपूर्व नालेसफाई १ जुनपूर्वी पूर्ण करण्याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेश दिले होते. यानुसार मनपाक्षेत्रात नालेसफाई जोरदारपणे सुरू आहे. याचबरोबर शंभर फुटी भोबे गटारीची सुद्धा स्वच्छता सुरू आहे. या कामाची मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी पाहणी करीत उरलेली सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, वृक्ष अधिकारी गिरीश पाठक, प्रमोद रजपूत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments