Daily Mahasatta

Daily Mahasatta

दुधोंडी कुंडल रस्त्याच्या साइटपट्टीचे काम निकृष्ट : विशाल तिरमारे

पलुस (अमर मुल्ला) : बोरगाव, घोगाव, दुधोंडी की.वाडी पलूस कॉलनी प्रजिमा क्र.२८ किमी ०६/१०० ते ०७/७०० व किमी ०८/१५० ते ०९/६०० रस्त्यालगत सुरू असणारे साइतपट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची,सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आरपीआय चे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालय पलूस येथील अधिकारी मोहन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
            
निवेदनात म्हटले आहे की दुधोंडी कुंडल रस्त्याकडेला सुरू असणारे साइटपट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. साइडपट्टी अंदाजपत्रकानुसार ६/१०० मी ०२ ×१.२५ मीटर × ११५० प्रती मीटर अंदाजपत्रकात करण्याचे नमूद आहे.परंतु प्रत्यक्षात अंदाजपत्रकानुसार काम न करता एक दिड फूट रस्ता उकरून माती मिश्रीत खडी टाकून साइटपट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्याचे चालू आहे. सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला आहे. गेली दोन वर्षे काम रखडल्यामुळे शेतकऱ्यांना सदर कामाचा त्रास होत आहे. अंदाजपत्रकानुसार तात्काळ चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आरपीआय चे पलूस कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Post a Comment

0 Comments